डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 13, 2025 3:13 PM | Bihar

printer

बिहार विधानसभा निवडणुकीत नीतिश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकरता नीतीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असतील, असं उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की भाजपा आणि रालोआ चा नीतिशकुमार यांच्यावर पूर्ण विश्वास असून त्यांच्या नेतृत्वाखालीच  निवडणूक लढली जाईल. या निवडणुकीत मतदारयाद्यांचं सखोल परीक्षण हा मुद्दाच नाही, विरोधक त्याबाबत जनतेची दिशाभूल करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.