बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात AIच्या गैरवापराबद्दल निवडणूक आयोगाचा इशारा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधातल्या उमेदवाराला   लक्ष्य बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करु नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश केला आहे. समाजमाध्यमांवर चुकीची, बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देण्यावर बंदी घातली आहे. प्रचारातल्या चित्र, चित्रफीत अथवा ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असल्यास तसं लेबल त्यावर लावणं आवश्यक आहे. समाजमाध्यमावर सक्रीय असणाऱ्यांमुळे निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याकरता कडक नजर ठेवण्यात येईल, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.