बिहार मतदार याद्यांचा मसुदा निवडणूक आयोग उद्या प्रसिद्ध करणार आहे. कुण्या मृत व्यक्तीचं नाव यादीत असेल किंवा एका व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेलं असेल तर त्यात दुरुस्ती करणं हा याचा हेतू आहे. मतदार याद्यांचा हा मसुदा तात्पुरता असेल, यावर आक्षेप नोंदवल्यावर यात दुरुस्ती केली जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
बिहारमधे मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्यावर यात २२ लाख मतदार मृत असल्याचं आढळून आलं, ७ लाख बनावट मतदार तर ३५ लाख स्थलांतरित मतदार आढळले. या सर्वांची नावं मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. उद्या यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत नागरिकांना आक्षेप नोंदवता येईल.