डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 30, 2025 2:23 PM | Bihar Election

printer

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय प्रचार

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय प्रचार सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीचे नेते मतदारांना आकर्षित करण्याचा  प्रयत्न करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी, अमित शहा तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज बिहारच्या विविध भागात प्रचारसभा घेत आहेत. बिहारमध्ये मुजफ्फरपूर इथं नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसवर टीका केली. जिथे बंदुकीचा धाक आणि क्रौर्य असतं तिथे कायद्याचं राज्य अस्तित्वात नसतं, असं मोदी यावेळी म्हणाले. भाजपा नेते अमित शहा यांची लखीसराय इथं प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली. 

 

भाजप मतांसाठी बिहारचं शोषण करून गुजरातमध्ये उद्योग स्थापन करत असल्याची टीका महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. बिहारच्या जनतेनं एकत्र येऊन रालोआला सत्ताधारी होण्यापासून रोखण्याचं आवाहन तेजस्वी यादव यांनी केलं आहे. 

 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ विधानसभा मतदारसंघांत ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.