डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Bihar Election : दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात वीस जिल्ह्यातल्या १२२ मतदारसंघांमधे मतदान होणार असून यासाठी १ हजार ६६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पहिल्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही आज संपणार आहे. या टप्प्यात १२१ जागांसाठी १ हजार ३७५ उमेदवार रिंगणात आहेत. 

 

दरम्यान, राजद प्रणीत महाआघाडीचं जागावाटप स्पष्ट झालं आहे. राष्ट्रीय जनता दलानं आज १४३ उमेदवारांची यादी जाहीर केली. राजदकडून माजी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी, भोजपुरी अभिनेता खेसारीलाल यादव, माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी हे दिग्गज रिंगणात उतरले आहेत. तर राजदचे रिषी चौधरी सिकंदरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसनेही आपल्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केली असून काँग्रेस एकूण ६० जागा लढवणार आहे. भाकप माले २०, व्हीआयपी ११, तर भाकप आणि माकप दहा पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र महाआघाडीतल्या घटक पक्षांमधे काही जागांवर मैत्रीपूर्ण निवडणूक होणार आहे.