बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्जांची छाननी आज पूर्ण झाली. या टप्प्यात ६ नोव्हेंबरला १२१ विधानसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या उमेदवारांना सोमवारपर्यंत माघार घेता येईल.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधे बिहार विधानसभा निवडणुकीसंबंधी चर्चा झाली. त्याआधी अमित शहा यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली.
दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चानं विरोधकांच्या या निवडणुकीसाठीच्या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय आज जाहीर केला. बिहारमध्ये ६ जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी दिली.