बिहार मध्ये आज होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाइल ॲप च्या माध्यमतून नागरिक ई मतदान करणार असून, अशा प्रकारे निवडणुकीत मतदानासाठी मोबाइल ॲपचा वापर करणारे बिहार हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे. बिहार मधे ६ नगर पंचायत आणि ३६ नगर पालिकांमध्ये आज निवडणुका होत असून सकाळी ७ ते संध्याकाळी ५ दरम्यान मतदान होत आहे. यामध्ये प्रथमच मोबाइल द्वारे ई मतदान करण्यासाठी ४० हजार नागरिकांनी अर्जाद्वारे निवडणूक आयोगाकडे नाव नोंदणी केली आहे. बिहारसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याच राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी म्हंटल आहे. या मोबाइल ॲप द्वारे मतदानाचा हक्क बजावण्याचा फायदा नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, गंभीर आजाराने ग्रस्त नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना होईल अस प्रसाद यांनी सांगितल. ई मतदानासाठी पुण्यातील सीडॅक संस्थेने सर्व सुरक्षा व्यवस्था असलेल्या आणि व्ही व्ही पॅट ची सुविधा असलेल्या दोन मोबाइल ॲपच्या यंत्रणा विकसित केल्याचही दीपक प्रसाद यांनी सांगितलं.
Site Admin | June 28, 2025 2:02 PM | Bihar Election
बिहारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाइल ॲपच्या माध्यमातून मतदान
