डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 17, 2024 8:22 PM | Bihar

printer

बिहारमध्ये विषारी दारूच्या सेवनाने २५ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये भेसळयुक्त दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत सिवानमध्ये २० जणांचा, तर  सारण जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दारूबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्री रत्नेश सदा यांनी दिली. दारू पिणाऱ्यांपैकी  २२ जणांची प्रकृती गंभीर असून, ३ जणांची दृष्टी गेली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून, मृतांच्या कुटुंबांना  दारूबंदी कायद्यानुसार नुकसान भरपाई दिली जाईल असं त्यांनी सांगितलं.