बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथ होणार आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 89 आमदार निवडून आले आहेत. या बैठकीत बिहारचे भाजप पर्यवेक्षकही सहभागी होतील अस बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितल.
संयुक्त जनता दल पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या होण्याची शक्यता असून त्यानंतरच एनडीए आघाडीतील पक्षांच्या आमदारांची एकत्र बैठक होण्याची शक्यता आहे. काल पाटणा इथ राष्ट्रीय जनता दलाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली त्यामध्ये तेजस्वी यादव यांची विधि मंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान, येत्या गुरुवारी पाटणा इथल्या गांधी मैदानावर, मुख्यमंत्री आणि नवीन सरकारचा शपथविधि समारंभ होणार असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.