भारतीय जनता पार्टी ने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी १८ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामुळं जागा वाटपात पक्षाला मिळालेल्या सर्व १०१ जागांवरचे उमेदवार भाजपाने जाहीर केले आहेत.
संयुक्त जनता दलानंही बिहार विधानसभा निवडणुकीसाठीची ४४ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. नितीश कुमार सरकारमधील कॅबिनेट मंत्री लेशी सिंह, जयंत राज, सुमित कुमार सिंह आणि शीला मंडल यांना उमेदवार म्हणून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय लोक मोर्चाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्या पत्नी स्नेहलता रोहतास विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.