बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनसुराज पक्षाची दुसरी यादी जाहीर

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनसुराज पक्षानं  ६५ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी पाटणा इथं पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. याआधी पक्षानं ५१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.  उमेदवारांच्या निवडीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचं प्रशांत किशोर यांनी सांगितलं. भागलपूर मतदारसंघातून अभयकांत झा यांना उमेदवारी दिली आहे.