डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीचे घटक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार असून यात आपली धोरणं जाहीर करण्यात येतील असं राजद नेते तेजस्वी यादव यांनी सांगितलं. राओलाची धोरणं, आणि मुख्यमंत्रपदाच्या उमेदवाराच्या नावावर यादव यांनी प्रश्न उपस्थित केले. 

 

राष्ट्रीय जनता दल हा पक्ष फक्त एकाच कुटुंबासाठी काम करतो. मात्र, सरकार सब का साथ सबका विकास या तत्वावर चालतं असं प्रत्यूत्तर लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी यादव याना दिलं. संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनीही महाआघाडीवर खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला असून मुख्यमंत्री नीतिश कुमार शब्दांपेक्षा आपल्या कामातून बोलत असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.