बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा मतदारसंघांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार असून, 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी नितीश कुमार सरकारमधील चार मंत्र्यांसह अनेक प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप उमेदवारांच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.दरम्यान, राज्यात निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल बिहारमधील सारण येथे पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. सारणमधील तरैया इथल्या प्रचारसभेत बोलताना, शहा यांनी गेल्या दोन दशकांत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा स्थापित केल्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली.
Site Admin | October 18, 2025 9:44 AM | Bihar Assembly Election
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत समाप्त; निवडणूक प्रचाराला तेजी
