बिहार मधल्या पाटणा जिल्ह्यातल्या दानियावान पोलीस चौकी परिसरात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दानियावान इथल्या राज्य महामार्गावर एका ऑटो रिक्षाला एका ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला.
जखमींना पाटणा इथल्या पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमधले सर्व नागरिक नालंदा जिल्ह्यातले रहिवासी असून ते सर्वजण फतुआ जिल्ह्यातल्या गंगा नदीच्या त्रिवेणी घाटावर पवित्र स्नानासाठी जात होते, अशी माहिती आमच्या प्रतिनिधींनं दिली आहे.