बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेत सुमारे तीन लाख लोकांना संशयास्पद नागरिकत्वावरून नोटीसा बजावल्या आहेत. या मतदार याद्या पुनरिक्षणात या लोकांनी त्यांची ग्राह्य कागदपत्रं जमा केलेली नाहीत.
या लोकांचा अधिक तपास केला असता त्यांचं नागरिकत्व संशयास्पद आढळून आलं असून त्यापैकी बहुतांश जण बांगलादेश व नेपाळचे नागरिक आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, नोटीस दिलेले बहुतांश नागरिक हे पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, अररिया आणि सुपौल या जिल्ह्यांतले आहेत. हे सर्व जिल्हे बिहारच्या सीमावर्ती भागात असून काही नेपाळला लागून आहेत.