बिहारमध्ये गंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याबाबतचा ऑरेंज अलर्ट केंद्रीय जलपरिषदेने दिला आहे. आज अनेक निरिक्षण स्थानकांजवळ पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती परिषदेने काढलेल्या विशेष निवेदनात दिली आहे.
पाटणा, भागलपूर अशा अनेक ठिकाणी गंगेच्या पाणीपातळीत खूप वाढ होईल असा इशारा दिला आहे. गंगेच्या खोऱ्यातील इतर नद्या उफाणल्या आहेत. कोशी नदी बालताराजवळ धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. शोन नदीच्या जलस्तरातही वेगाने वाढ होत आहे. आणि रोहतास जिल्ह्यात यदुनाथपूरजवळ ती धोक्याच्या पातळीच्या एक मीटर वरुन वाहत आहे.