देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाचं मोठं योगदान – मंत्री राजीव रंजन सिंह

मच्छिमारांचा व्यवसाय वाढावा आणि त्यांना सुरक्षितता मिळावी, यासाठी केंद्रसरकार खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या १ लाख जहाजांवर ट्रान्सपॉन्डर्स बसवणार आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर नवी दिल्लीमध्ये आयोजित राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज ही माहिती दिली. मासेमारी जहाजाने सागरी हद्द ओलांडल्यावर देखील हे ट्रान्सपॉन्डर्स अलर्ट जारी करतील, असं ते म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाचं मोठं योगदान असून, मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनात आणि विकासात  अंतराळ तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.