डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 23, 2025 1:29 PM

printer

सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार आहेत. आज संध्याकाळी गवई आपल्या पदावरून मुक्त होतील आणि त्यानंतर न्यायमुर्ती सुर्यकांत पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती सुर्यकांत उद्या देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती सुर्यकांत पुढचे १५ महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील, आणि वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यावर ९ फेब्रुवारी २०२७ ला ते निवृत्त होतील.

 

हरियाणात हिसार जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वकील म्हणून आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केली होती.  २०११ मध्ये त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायदानाची जबाबदारी सांभाळली होती, तसंच ते काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. 

 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून  कलम ३७० रद्द करणं, तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणं, बिहारमधील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता. 

 

सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह बार असोसिएशनमधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यातही त्यांनी योगदान दिलं होतं.