देशभरात वन्यजीव अधिवासांचं संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं एकात्मिक विकास योजनेचा अवलंब केला जात असल्याची माहिती केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.
वन्यजीव अधिवास संवर्धनासाठी तसंच मानव- वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य दिलं जातं, असं त्यांनी यासंदर्भातल्या एका प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात म्हटलं आहे.
मानव- वन्यजीव संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं जारी केलेल्या मानक कार्यपद्धतींचं पालन होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.