मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भंडाऱ्यात ५४७ कोटीच्या विकास कामांचं भूमीपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यात ५४७ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन केलं. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावर १०२ कोटी रुपये खर्च करून नव्यानं सुरू केलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी केलं. यावेळी भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.