भीमा कोरेगाव इथं होणाऱ्या शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची  बैठक

पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं एक जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाची  बैठक झाली. या सोहळ्यानिमित्त भीमा कोरेगाव इथं येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सोयीसुविधा पुरवाव्यात अशा सूचना सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचि डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी दिल्या. या बैठकीला समाजकल्याण आयुक्त दीपा मुंडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.