माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘भाषा सेतू’ स्पर्धेत भाग घेण्यासाठीची मुदत येत्या ३० तारखेपर्यंत वाढवली आहे. या स्पर्धेसाठी स्टार्टअप्स कडून १२ भारतीय भाषांमधल्या भाषांतरासाठी तसेच आवाजाच्या स्थानिकीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेली कार्यरत प्रारूपं अपेक्षित आहेत. सर्वसमावेशक स्वदेशी डिजिटल प्रशासनासाठी उपयोगी पडणारं तंत्रज्ञान तयार करण्यास प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेमागचा हेतू आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिकृत वेव्ह्ज एक्स पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन मंत्रालयाने केलं आहे.
Site Admin | July 22, 2025 8:07 PM | Bhasha Setu Challenge
‘भाषा सेतू’ स्पर्धेत भाग घेण्यासाठीची येत्या ३० तारखेपर्यंत मुदतवाढ
