डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 29, 2024 9:41 AM | भाजपा

printer

भाजपाचा आपल्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय 

भाजपानं त्यांच्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यात बडनेराची जागा युवा स्वाभिमान पार्टी, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिनाची जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीला आणि शाहुवाडीची जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला दिली आहे. यासंदर्भातलं पत्रक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी प्रसिद्ध केलंय. 

 

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाला शिवसेनेच्या कोट्यातून धारावी आणि भाजपाच्या कोट्यातून कालिना हे दोन मतदार संघ दिल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. महायुतीची सत्त्ता आल्यानंतर त्यांच्या पक्षाला एक विधानपरिषद सदस्यत्व,  राज्यात एक कॅबिनेट मंत्री पद तसेच 4 महामंडळांचं अध्यक्ष पदे आणि महामंडळ संचालक याशिवाय इतर विविध पदं दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिल्याचं ते यावेळी म्हणाले. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.