डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यसभेत भारतीय वायुयान विधेयक २०२४ मंजूर

विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना देशाच्या आर्थिक, सामाजिक मूल्यांवर परदेशी संस्थांकडून दोषारोप होत असल्याचा मुद्दा राज्यसभेत शून्य प्रहरात भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी मांडला, त्यांना बोलण्यासाठी राज्यसभा अध्यक्ष जगदीश धनखड यांनी अधिक वेळ दिल्याबद्दल विरोधी पक्षांनी आक्षेप घेत गदारोळ केला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केलं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज सुरळीतपणे झालं.

 

भारतीय वायुयान विधेयक २०२४ आज राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेत हे विधेयक पावसाळी सत्रात मंजूर झाले आहे. या विधेयकात विमानाचे उत्पादन, देखरेख, दुरुस्ती, आयात तसंच अपघाताची चौकशी याबद्दलचे नियम आहेत. 

 

गेल्या १० वर्षात देशभरात साडेदहाहजाराहून अधिक नवीन टपाल कार्यालयं उघडली असून त्यातली ९० टक्के कार्यालयं ग्रामीण भागात , तर ५ हजाराहून अधिक कार्यालयं नक्षलवादी चळवळीने प्रभावित क्षेत्रात आहेत अशी माहिती  केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आज राज्यसभेत दिली. येत्या काळात देशात दर ३ किलोमीटरवर एक टपाल कार्यालय सुरु करण्याचं  सरकारच उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

गेल्या १० वर्षात इंटरनेट डेटा ची किंमत प्रति २६९ रुपये प्रति गिगा बाईट वरून ८ रुपये  ३१ पैसे प्रति गिगा बाईट पर्यंत खाली उतरल्याचंही पेम्मासानी यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.