वर्ष २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी सरकारनं एक दृष्टीकोन निश्चित केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत विकास परिषदेच्या ६३ व्या स्थापना दिन समारंभात बोलत होते. आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगताना कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत विकास परिषदेनं देशातल्या कोट्यवधी लोकांच्या जीवनात लक्षणीय बदल घडवून आणला असून, स्वातंत्र्याचा शतकोत्सव साजरा होईल, तेव्हाही देशाच्या विकासात ही संस्था योगदान देतच असेल, असं ते म्हणाले.
Site Admin | July 14, 2025 8:12 PM | Bharat Vikas Parishad
२०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी सरकारचा दृष्टीकोन निश्चित – गृहमंत्री अमित शहा
