नवी दिल्लीत होणाऱ्या भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२५ ची सर्व दालनं भरली असल्याची माहिती भारतीय तांदूळ निर्यात महासंघानं दिली. ही परिषद ३० आणि ३१ ऑक्टोबरला भारत मंडपम इथं होणार आहे.
या परिषदेत सुमारे १५० तांदूळ उत्पादक सहभागी होणार असून त्यात तांदळाशी संबंधित विविध नवकल्पना, तंत्रज्ञान आणि प्रीमियम तांदूळाच्या विविध जाती सादर केल्या जातील.करणार आहेत. जागतिक तांदूळ उद्योगाच्या इतिहासातली ही सर्वात मोठी परिषद असून यात ८० हून अधिक देशांतले एक हजारांहून अधिक खरेदीदार आणि देशातले पाच हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत.
या परिषदेत जीआय-टॅग मिळालेले काला नमक राइस, काली काशा, गोविंद भोग, इंद्रायणी जोहा राइस आणि ब्लॅक राइस या तांदूळाच्या जाती बघायला मिळणार आहेत. तांदूळाच्या या जाती त्या त्या प्रदेशांत लोकप्रिय असल्या तरी या परिषदेच्या माध्यमातून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळण्याची संधी पहिल्यांदाच मिळणार आहे.