छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरु केली जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
नांदेड – पुणे रेल्वे गाडीला वंदे भारत मध्ये रुपांतरित करण्यासंदर्भात परभणीचे खासदार संजय जाधव यांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं काम सुरु असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.
पुणे आणि हडपसर इथल्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करुन, त्यांची क्षमता वाढवण्याचं काम सुरु आहे, त्यानंतर या स्थानकांवरुन रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.