भारत आणि भूतान या दोन देशांनी कोकराझार ते गेलेफू आणि बानरहाट ते सामत्से यादरम्यान सीमापार दोन रेल्वे प्रकल्प उभारायला संमती दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सुमारे ९० किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग ४ हजार ३३ कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. भूतानच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात सुलभ रेल्वे जोडणी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीही यावेळी उपस्थित होते. भारत आणि भूतान यांच्यातले संबंध विश्वास, परस्पर आदर आणि सामंजस्यावर आधारलेले असल्याचं मिस्री यांनी सांगितलं.
Site Admin | September 29, 2025 8:27 PM
भारत आणि भूतान रेल्वेमार्गानं जोडले जाणार