बांगलादेशातल्या अंतरीम सरकारनं करदात्यांचा पैसा वाचवण्यासाठी आणि सरकारी तिजोरीवरील खर्चाचा ताण कमी करण्याच्या उद्देशानं भारत-बांगलादेश सीमेजवळील तीन भू-बंदरे पूर्णपणं बंद करण्याचा तर आणखी एका भू-बंदरावरील कामकाज काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती युनायटेड न्यूज ऑफ बांगलादेशनं दिली.
निलफामारीतील चिलाहाटी भू-बंदर, चुआडांगा जिल्ह्यातील दौलतगंज भू-बंदर आणि रंगामाटीतील तेंगामुख भू-बंदर बंद करणार असून हबीगंजमधील बल्ला भू-बंदरावरील कामकाज स्थगित केलं आहे. मुख्य सल्लागार प्रा. मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात झालेल्या सल्लागार मंडळाच्या बैठकीत या निर्णयाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.