December 2, 2024 7:41 PM | Bangladesh

printer

बांग्लादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालय परीसर तोडफोड प्रकरणी भारताकडून खेद व्यक्त

आगरतळा इथं झालेल्या बांग्लादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालय परीसर तोडफोड प्रकरणी भारतानं खेद व्यक्त केला आहे. दूतावास मालमत्तांना कोणत्याही परिस्थितीत लक्ष्य केले जाऊ नये असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. देशाभरातल्या बांग्लादेश उच्चायुक्त, दूतावास आणि अधिकार्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी भारत सरकार पावले उचलत आहे.