मुंबईत भांडुप बेस्ट बसच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

मुंबईत भांडुप इथं काल रात्री ‘बेस्ट’ च्या गाडीने धडक देऊन झालेल्या अपघातात चार पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. बस चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. 

 

भांडुप बस दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांप्रति त्यांनी सह वेदना व्यक्त केली आहे. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडुप बस दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला असून, दुर्घटनेतल्या मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.