भंडारा- नागपूर रस्त्यावर गाडीला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर रीत्या जखमी झाला आहे. अपघातग्रस्त झालेली बोलेरो गाडी भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेने जात होती.
वाटेत बेला इथे गाडी ओव्हरटेक कर असताना समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर काही काळ महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमी प्रवाशाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.