भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामात धान उत्पादन चांगलं झालं तरी खरेदीची मर्यादा सरकारने वाढवली नसल्यानं धानखरेदी रखडली आहे. सरकारने आधारभूत धान खरेदी केंद्रावर ५ लाख ७५ हजार क्विंटल धान खरेदी पूर्ण केली. पण धान्यखरेदीची पुढील मर्यादा न ठरवल्यानं धान पडून आहे. व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकावं लागू नये म्हणून सरकारनं धान खरेदीची मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी भंडारा जिल्ह्यातले शेतकरी करत आहेत.
Site Admin | July 3, 2025 4:06 PM
भंडारा जिल्ह्यात धानखरेदी रखडली
