डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४च्या उद्घाटनासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल यांची निवड

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या उद्घाटन समारंभासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल यांची निवड करण्यात आली आहे. या पॅरालिम्पिकमध्ये ८४ भारतीय खेळाडू भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. या पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या दरम्यान होणार आहेत. 

 

भाग्यश्री जाधव ही २०२२ मधल्या आशियाई पॅरालिम्पिक शॉटपुट प्रकारातली रौप्य पदक विजेती आहे. सुमित अंतिल मे महिन्यात झालेल्या, पॅरा-ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमधल्या पुरुषांच्या भालाफेक F-64 प्रकारातला सुवर्णपदक विजेता आहे. 

 

दरम्यान, पॅरिस ऑलिंपिक मधे नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या लष्करातल्या कर्मचाऱ्यांचा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज सत्कार केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.