‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त येत्या महिला दिनापर्यंत म्हणजेच ८ मार्चपर्यंत दशकपूर्ती अभियान राबवण्यात येणार आहे.  आज  राज्यात ठिकठिकाणी अभियानाचा प्रांरभ करणारे कार्यक्रम झाले. 

नाशिक महानगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्तांनी उपस्थितांना बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाची शपथ दिली. धुळ्यात जनजागृती रॅलीने अभियानाला सुरुवात झाली. परभणीतही कार्यक्रम आयोजित झाला होता.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.