मुंबईतल्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी बेस्टनं अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरवतानाच, स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिल्या. ते आज मुंबईत बेस्टच्या आढावा बैठकीत बोलत होते.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतुकीसाठी तीन टक्के राखीव तरतूद केली तर याचा बेस्टला फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.
टोल माफ करावेत, कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटी १ हजार ६५८ कोटी रुपये मिळावेत, सरकारी कर माफ करावा, अशा मागण्या बेस्टचे व्यवस्थापक श्रीनिवास यांनी केल्या. त्यावर, याबाबत प्रस्ताव सादर करावेत, शासन त्याचा सकारात्मक विचार करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सहपालकमंत्री आशिष शेलार, अधिकारी उपस्थित होते.