डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बेल्जियमच्या राजकन्या अ‍ॅस्ट्रिड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बेल्जियमच्या राजकन्या अ‍ॅस्ट्रिड आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्या आठ मार्चपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत. राजकन्या अ‍ॅस्ट्रिड यांनी बेल्जियमचे संरक्षणमंत्री थियो फ्रँकस्केन यांच्यासमवेत काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रात बेल्जियमच्या गुंतवणुकीचं स्वागत केलं. बेल्जियमच्या कंपन्या भारतात त्यांचा विस्तार करून आणि भारतीय उत्पादकांना त्यांच्या पुरवठा साखळीत समाविष्ट करून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी सूचना राजनाथ सिंह यांनी केली. एक संस्थात्मक संरक्षण सहकार्य यंत्रणा निर्माण करण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती दर्शविली.