संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे जबाबदार असतील, ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्या सर्वांवर कडक कारवाई करू, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात गुंडांचं, हिंसेचं, खंडणीखोरांचं राज्य चालू देणार नाही. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड यांना शरणागती पत्करावी लागली, असं सांगून उर्वरित फरार आरोपींना पकडण्यासाठी पथकं काम करत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.