बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आज मस्साजोगमधल्या ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. यात देशमुख यांचा भाऊ धनंजय यांच्यासह कुटुंबीय सहभागी झाले होते. तपासाची माहिती आपल्याला आणि ग्रामस्थांनी द्यावी तसंच आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आहे, असं धनंजय देशमुख यांना वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
Site Admin | January 13, 2025 4:02 PM
कराडवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी मस्साजोग ग्रामस्थांचं आंदोलन
