आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या जमातींना जात प्रमाणपत्र मिळावं, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी आज उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माजलगाव आणि बीडचे जिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली.