डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 4, 2025 2:46 PM | Santosh Deshmukh

printer

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीं पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल

बीड जिल्ह्यात मस्साजोग इथल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल दिलं. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.

 

त्यावेळी ते बोलत होते. मुख्य आरोपींना ठिकाणावरून स्थलांतरीत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असंही त्यांनी सांगितलं. फरार आरोपी कृष्णा आंधळे यालाही लवकरच अटक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  बीड जिल्ह्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करु असंही ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.