भारत आणि पाकिस्तान यांच्या अटारी-वाघा संयुक्त तपासणी नाक्यांवरील बीटिंग रिट्रीट समारंभ आज संध्याकाळपासून सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर 8 मे रोजी औपचारिक कवायत थांबवण्यात आली होती. आजपासून कवायती दरम्यान दरवाजे बंद राहणार असून दोन्ही देशांच्या सुरक्षा कर्मचा-यांमध्ये हस्तांदोलन तसंच कोणत्याही प्रसंगी मिठाई किंवा भेटवस्तूंची देवाणघेवाण होणार नाही.
Site Admin | May 21, 2025 10:01 AM | Beating Retreat Ceremony
अटारी-वाघा संयुक्त तपासणी नाक्यांवरील बीटिंग रिट्रीट समारंभ आजपासून खुला
