October 7, 2024 3:57 PM

printer

नायगाव इथल्या बीडीडी चाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव

मुंबईतल्या नायगाव इथल्या बीडीडी चाळीचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल असं करण्यात आलं आहे. या चाळीत डॉक्टर आंबेडकर राहत असत, तसंच इथं आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर राहतात, त्यामुळे चाळीला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिक अनेक दिवसांपासून करत होते. ही मागणी मान्य करत राज्य सरकारने चाळीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल असं करण्याचा आदेश जारी केला आहे.