डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बीसीसीआयनं महिला प्रीमियर लीगचं वेळापत्रक केलं जाहीर

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिलांच्या प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातल्या सामन्याने होईल.

 

हा सामना १४ फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यातल्या बीसीए मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. यंदा वडोदरा, बेंगळुरू, लखनौ आणि मुंबईत सामने होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ मार्च रोजी मुंबईत होईल.