May 24, 2025 8:03 PM | BCCI | ENGvIND

printer

इंग्लड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यीय कसोटी क्रिकेट संघ आज जाहीर केला आहे. संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलं असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

याशिवाय कसोटी संघात यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईस्वरन, करूण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॊशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप,अर्षदीप सिंग आणि कुलदीप यादव या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.  भारताचे दिग्गज कसोटीपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.