बलुचिस्तानमध्ये नागरिक बेपत्ता होण्याचं आणि न्यायबाह्य हत्यांचं प्रमाण वाढलं असून, पाकिस्तानकडून होत असलेल्या साधन संपत्तीच्या वाढत्या शोषणाशी याचा संबंध स्पष्ट होत असल्याचं ‘बलोच ऍडव्होकसी अँड स्टडीज सेंटर’ च्या अहवालात म्हटलं आहे.
यानुसार, जानेवारी ते जून २०२५ या काळात बलुचिस्तानमध्ये ८२४ नागरिक बेपत्ता झाले, यापैकी ५३० जणांचा अद्याप शोध लागला नाही. यात ४२ टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी असून, त्या खालोखाल कामगार आणि वाहन चालक आहेत.
खाण आणि खनिज कायदा, २०२५ आणि दहशतवाद विरोधी (बलुचिस्तान सुधारणा) कायदा, २०२५ लागू झाल्यावर उसळलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर या गुन्हांमध्ये वाढ झाल्याचं यात म्हटलं आहे.
पाकिस्तान आणि अमेरिकेदरम्यानचा खनिज करार याला कारणीभूत असून, नफा कमवण्यासाठी बलूच नागरिकांचा बळी दिला जात आहे. या गोष्टीची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी व्हावी, असं आवाहन या अहवालात केलं आहे.