December 11, 2025 8:19 PM | Bank Recruitment Exam

printer

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची सुधारित पद्धत जारी

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याबाबतचा सुधारित आराखडा अर्थमंत्रालयानं आज जारी केला. त्यानुसार आता सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील, त्यानंतर राष्ट्रीयीकृत  बँकांचे आणि सर्वात शेवटी प्रादेशिक ग्रामीण बँकांचे निकाल जाहीर होतील. त्याचप्रमाणे, या तिन्ही  श्रेणींमधल्या बँकांचे अधिकारी-स्तरीय परीक्षांचे निकाल सुरुवातीला जाहीर होतील, त्यानंतर लिपिक-स्तरीय परीक्षेचे निकाल जाहीर होतील, असं यात म्हटलं आहे.