बंगळुरूमध्ये 44 व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धांना सुरुवात

बंगळुरूच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमध्ये कालपासून 44 व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धांना सुरुवात झाली. देशभरातून हजार खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहे. उद्घाटनाच्या कालच्या दिवशी एकंदर चाळीस सामने खेळवले गेले. चार जानेवारीला अंतिम फेरीचे सामने होणार आहेत. दरम्यान 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा तेलंगणामध्ये 11 ते 15 जानेवारीदरम्यान होणार आहेत.