डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 11, 2024 1:24 PM | Bangladesh

printer

बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनूस यांनी अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांचा निषेध केला

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेते, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी देशातल्या अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. सर्व हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्यांकांचं  संरक्षण करायला हवं, असं आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.

 

दरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाका आणि ईशान्येकडच्या चटग्राम इथं काल सलग दुसऱ्या दिवशी तिथल्या हजारो अल्पसंख्याक हिंदूंनी आपल्या विविध मागण्यांसाठी  आंदोलन केलं. अल्पसंख्याकांच्या खटल्यांना वेग देण्यासाठी विशेष लवाद स्थापन करणं, अल्पसंख्याकांसाठी १० टक्के संसदीय जागा आरक्षित करणं आणि अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करावा  अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.