रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांना पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी शाखेने घेतलं ताब्यात

रत्नागिरी जिल्ह्यात नाखरे गावांत बेकायदा वास्तव्यास असलेल्या १३ बांग्लादेशी नागरिकांना काल रत्नागिरी पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी शाखेनं ताब्यात घेतलं. त्यांच्यावर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.